जेथून जातो ज्ञानेश्वरीचा मार्ग, तेथे आत्मा हरखून नाचतो…”
मराठी संस्कृती, संत परंपरा आणि आध्यात्मिक विचारसरणी या तिन्हींचं सजीव रूप म्हणजे संत श्री ज्ञानेश्वर महाराज. माझ्या ब्लॉगच्या पहिल्या लेखाची सुरुवात या महान संताच्या चरणांशी जोडली जावी, असं मनापासून वाटलं – कारण ज्ञानेश्वर म्हणजे केवळ संत नव्हेत, ते एक दिशादर्शक, कवी, तत्वज्ञ आणि हजारो मराठी मनांचं प्रेरणास्थान आहेत.
